गुन्हेगारीमहाराष्ट्र

नवी मुंबई पत्रकार हल्ला प्रकरणी पत्रकार सुरक्षा समितीने घेतली गृहराज्यमंत्र्यांची भेट

तातडीने कारवाई करण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन

0 0 2 0 3 8

नवी मुंबई पत्रकार हल्ला प्रकरणी पत्रकार सुरक्षा समितीने घेतली गृहराज्यमंत्र्यांची भेट

तातडीने कारवाई करण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन

एपीएमसी पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्यासह देविदास ढमाले यांच्यावर कारवाईची टांगती तलवार

नवीमुंबई : प्रतिनिधी

गेल्या महिन्याभरात नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पत्रकारांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक अमिषापोटी चक्क पोलीस अधिकाऱ्यांनीच येथील बोगस पत्रकारांना हाताशी धरून पत्रकारांना मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांना पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने निवेदन देऊन 5 दिवस उलटले तरीही कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे अखेर मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष किरण बाथम, नवीमुंबई – रायगड अध्यक्ष राज भंडारी यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन या प्रकरणी एपीएमसी पोलीस निरीक्षक अजय शिंदे आणि त्यांचे वसुली कारकून देविदास ढमाले यांच्यावर निलंबनाची कारवाई करून सोबत वसुलीसाठी वापरण्यात येणाऱ्या बोगस पत्रकार परमेश्वर सिंग आणि परमानंद सिंग यांच्यासह संबंधित बार चालकांविरोधात कारवाई करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी दोषी अधिकाऱ्यांसह हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन उपस्थित पत्रकारांना दिले.

नवीमुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बाबा पॅलेस या लेडीज सर्व्हिस बारच्या मालकांसह गुडांनी पोलिसांच्या मदतीने पत्रकार देवेश मिश्रा याच्यावर हल्ला करून त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला फसवीण्याचा प्रकार करीत आहेत. असाच प्रकार रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडत आहे. एका बांधकाम व्यवसायिकाविरोधात स्वतःचे पैसे मिळविण्यासाठी सचिन कदम या पत्रकाराने उपोषणाचे हत्यार उपासले होते. मात्र उपोषणादरम्यान दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते. मात्र रबाळे पोलिसांनी तात्काळ उपोषणकर्ते पत्रकार सचिन कदम यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप सचिन कदम यांनी गृहराज्य मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. गेल्या महिन्याभरात सर्वप्रथम संतोष जाधव या पत्रकाराला देखील अशाच प्रकाराला सामोरे जावे लागले आहे.

याबाबत पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष किरण बाथम आणि नवीमुंबई रायगड जिल्हा अध्यक्ष राज भंडारी यांच्यापर्यंत सदर पिडीतांनी आपली समस्या मांडल्यानंतर दिनांक 7 फेब्रुवारी रोजी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांची भेट घेण्यात आली होती. यावेळी पोलीस प्रशासनाकडून आश्वासने तर देण्यात आली, मात्र कारवाईबाबत पोलीस उपायुक्त देखील फेल ठरल्यामुळे अखेर पत्रकार सुरक्षा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गृहराज्य मंत्र्यांची भेट घेऊन पीडित पत्रकारांना मंत्र्यांसमोर उभे करून परिस्थितीची जाणीव करुन दिली. यावेळी गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे अश्वासन देत इतरही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देणार असल्याचे सांगितले. यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे किरण बाथम, राज भंडारी यांच्यासह पीडित पत्रकार देवेश मिश्रा, संतोष जाधव, सचिन कदम, अजेंद्र आगरी आदि पत्रकार उपस्थित होते.

4.5/5 - (2 votes)

खबरे दुनिया कि

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 0 3 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे