लोकसभा निवडणूक धामधुम सर्व पक्षांकडून जय्यत तयारी सुरू….जनतेमध्ये चर्चेला उधाण….
2024 ची निवडणूक कधी नव्हे ती चुरशीची वाटायला लागली आहे....त्याला कारणे ही तशीच आहेत,गेल्या 2 वर्षात महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये अनेक अकल्पनीय घटना घडल्या आहेत... महाराष्ट्र तर या अलबेल घटनेचे केंद्रबिंदू ठरला आहे...पक्ष फुटी प्रकरण असो वा मराठा आरक्षण सगळ्याच गोष्टी राजकारणी मंडळींच्या झोपा उडवून गेल्या आहेत...आज जनतेच्या मनात काय सुरु आहे याचा थांगपत्ता नेत्यांना लागेना,तर कोणता राजकारणी कधी पक्ष बदलेल याची जनतेला खात्री मिळेना... सगळंच अजब आहे...फुटीर नेते ही आता जे केलंय ते बरोबर की चूक या विचारात अडकले आहेत...तर ज्यांनी नेते फोडलेत त्यांनाही आपण केलं ते योग्य की आयोग्य असे प्रश्न पडले आहेत...कारण जनता...राजकारणी आणि नेते यांचे भविष्य जनता ठरवत असते आणि यावेळी नेमकी ही जनता काय निर्णय घेणार याची उकल कोणत्याच नेत्याला होईना...त्यामुळे सर्वे कधी उलथून पडतील याचा नेम नाही...एकूण काय तर 2024 ची लोकसभा निवडणूक सर्वच नेत्यांची झोप उडवणारी निवडणूक ठरणार आहे...नेत्यांची नाराजी,आयाराम गयारमांची झालेली रेलचेल,जुन्या नव्या नेत्यांची समजूत काढता काढता पक्षाची होत असलेली फरपट आणि जनतेचा कौल काळात नसल्याने निर्माण होणारा गोंधळ सगळंच 2024 या निवडणुकीला चुरशीची बनवून गेलं आहे...पण काहीही असो देशात आणि राज्यात जे सुरू आहे सगळंच फार चुकीचं सुरू आहे...आणि जनता हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघते आहे...राजकारण म्हणजे नुसता चिखल होऊन बसला आहे अशी जनतेची धारणा झाली आहे...जनतेच्या मतांचा आणि भावनांचा झालेला अनादर यावेळी नेत्यांना चांगलाच धडा देऊन जाईल यात शंकाच नाही...तरही प्रत्येक पक्ष 2024 लोकसभा निवडणुकीकरीता जय्यत तयारीला लागला आहे...थोडक्यात 2024 ची निवडणुकीची धामधुम नेते आणि जनतेमध्ये सुरू झाली आहे...जसे गेल्या दोन वर्षात नेत्यांनी अनेक भूकंप घडवून आणले तसेच भूकंप मतदानातून जनतेने नेत्यांना दिले तर त्यात नवल वाटू नये...