आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे विचार जपण्याचे कार्य म्हणजेच पत्रकारिता – जे.एम.म्हात्रे
पत्रकारांच्या आरोग्यासाठी प्राचीन हॉस्पिटल सदैव तत्पर- डॉ.मंगेश डाके

पनवेल तालुका पत्रकार महासंघातर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा
नवीन पनवेल(प्रतिनिधी):
मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र दि. 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले, त्यामुळे आजचा दिवस (6 जानेवारी) मराठी पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात साजरा केला जात आहे. खरंतर दर्पण या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून देशात मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ उभी करणारे बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहेत. दि. 6 जानेवारी 1812 रोजी कोकणात एका सामान्य घरात जन्माला आलेल्या बाळशास्त्री यांचे जीवनमान अवघ्या 34 वर्षाचे होते, पण त्यांच्या विचारांचा ठेवा, काम करण्याची कार्य पद्धत आणि समाजात प्रबोधन घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांचे स्मरण म्हणून आजही अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. नुकताच पनवेल तालुका पत्रकार महासंघ आणि प्राचीन हेल्थकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्तविद्यमाने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन पनवेल नगर परिषदेचे माजी आदर्श नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांच्या शुभहस्ते पार पडले, यावेळी प्राचीन हेल्थकेअर मल्टीस्पेशालिटीचे संचालक मंगेश डाके, जेष्ठ सल्लागार प्रमोद वालेकर, पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील उपस्थित होते.
सदर आरोग्य शिबिरामध्ये प्रामुख्याने पत्रकारांची रक्त तपासणी, इसीजी, एक्स-रे आणि अस्थिरोग संदर्भात तपासण्या तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आल्या. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आरोग्य शिबिराचे आयोजन झाल्याने उपस्थित मान्यवर तसेच पत्रकार बांधवांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी प्राचीन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. मंगेश डाके यांनी पत्रकारांना यावर्षी मोफत आरोग्य तपासणीची अनोखी भेट देत भविष्यातील पत्रकार दिन मोफत आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय जाहीर करत पत्रकारांच्या आरोग्यास सुदृढ राहण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासित केले. सदर कार्यक्रमाला पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे ज्येष्ठ सल्लागार प्रमोद वालेकर, ज्येष्ठ पत्रकार रमेश भोळे, पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील, सचिव प्रदीप वालेकर, खजिनदार सुधीर पाटील, पत्रकार सुभाष वाघपंजे, दत्तात्रय मोकल, राजू गाडे, दीपक कांबळे, ऋषिकेश थळे, पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष किरण बाथम, रायगड, नवी मुंबईचे अध्यक्ष राज भंडारी, सदस्य भूषण साळुंखे, चंद्रकांत शिर्के, सुनील वारगडा, समाजसेवक रविंद्र पाटील, रायगड शिव सम्राटच्या सहसंपादिका सुनंदा पाटील, सुनीता पाटील, सृष्टी कॉम्प्युटरचे अक्षय वर्तक, रिया कुलिये, राज इंटरप्राईजेसचे सुमेध वाघपंजे, गुड हेल्थ ग्रुपचे प्रकाश जगदाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.