ब्रेकिंग

पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची घेतली सांत्वनपर भेट

नागपूरमधील सुकळी येथील निवासस्थानी सांत्वनपर भेट घेत केले सांत्वन

0 0 2 0 3 7

पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची घेतली सांत्वनपर भेट

पनवेल:

महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आई कै.मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नागपूरमधील सुकळी येथील निवासस्थानी शुक्रवारी (दि. १० जानेवारी) सांत्वनपर भेट घेऊन पटोले कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी सुदाम पाटील यांनी कै.मीराबाई पटोले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आई कै.मीराबाई पटोले यांच्या निधनामुळे पटोले कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पटोले कुटुंबियांना आधार देण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय नेतेमंडळी देखील मोठ्या संख्येने सुकळी येथे उपस्थित राहत आहेत. दरम्यान शुक्रवारी (दि. १० जानेवारी) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाना पटोले यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

खबरे दुनिया कि

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 0 3 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे