गुन्हेगारी

रस्त्याच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेले सा. बां. चे अधिकारी रिकाम्या हाताने परत

अपघात रोखण्यासाठी तक्रारदार अधिकारी पिता - पुत्राची शासन पातळीवर तगमग सुरूच

0 0 2 0 3 8

रस्त्याच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेले सा. बां. चे अधिकारी रिकाम्या हाताने परत

अतिक्रमण करणाऱ्यांनी घेतला मुस्लिम असल्याचा गैरफायदा; अतिक्रमण हटविण्यासाठी तक्रार करणारा देखील मुस्लिमच

अपघात रोखण्यासाठी तक्रारदार अधिकारी पिता – पुत्राची शासन पातळीवर तगमग सुरूच

रायगड : राज भंडारी

नागोठणे – पोयनाड रस्ता क्र – 87 हा रस्ता HAM अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रहदारीच्या दृष्टीने सहा पदरी असे रुंदीकरण करण्यासाठी शासनाच्यावतीने भुसंपादित करण्यात आला असतानाही याठिकाणी येथील काही तरुणांनी शासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून अतिक्रमण केल्याचा प्रकार समोर आला. मात्र येथील अतिक्रमण हे आजही ऐटीत उभे राहिल्यामुळे रस्ता रुंदीकरण कामाला सुरुवात होऊ शकली नसल्याचा आरोप स्थानिक तक्रारदार नसीम खान अधिकारी यांनी केला आहे. तसेच अतिक्रमण धारकांकडून मुस्लिम असल्यामुळे नोटीसा पाठवून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा बनाव करण्याचा प्रकार हा पूर्ण खोटे असल्याचा निर्वाळा देखील देत मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे काम अतिक्रमण धारकांनी केले असल्याचे तक्रारदार नसीम खान अधिकारी यांनी यावेळी सांगितले.

येथील स्थानिक मुळ जागामालक नसीम अधिकारी आणि त्यांचा मुलगा दानिश अधिकारी यांनी संबंधित अतिक्रमण हटविण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरु केला. सदरील चौक रस्त्यालगत दोन शाळा आणि महाविद्यालये आहेत तसेच याच रस्त्यावर रिलायन्स कंपनी देखील आहे. या कंपनीमुळे याठिकाणी अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर ये – जा करीत असतात, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याठिकानी ये – जा करणाऱ्या शाळकरी मुलांचे संरक्षण व्हावे यासाठी रस्त्याचे रुंदीकरण महत्वाचे आहे. मात्र सदर चौक परिसरात तब्बल 7 जणांनी अतिक्रमणे करून आपली दुकाने थाटली आहेत. याचा फटका येथील शालेय विद्यार्थ्यांना बसत असल्यामुळे स्थानिक तक्रारदार नसीम खान यांनी याठिकाणी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला.

पेण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी डी. एम. पाटील यांनी सदरील अतिक्रमण हटविण्याच्या नोटीसा 07 ऑगस्ट 2024 पासून अतिक्रमण धारकांना पाठविल्या. यामध्ये मंजर महम्मद अली जुईकर, इकबाल पेणकर, बशीर शिदी, म्हात्रे ट्रेडर्स, मीरा गॅरेज, आयझल चिकन सेंटर आणि पटेल हॉटेल यांच्या नावाने नोटीसा काढण्यात आल्यानंतर सदरील अतिक्रमण हे 7 दिवसात हटविण्याचे या अतिक्रमण धारकांनी मान्य केले होते. मात्र साडे पाच महिने उलटून गेल्यानंतरही सदर अतिक्रमण हे अतिक्रमण धारकांनी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने हटविण्यात आले नाही.

नसीम अधिकारी आणि त्यांचा मुलगा दानिश अधिकारी यांनी वारंवार अतिक्रमण हटविण्याबाबतचा तगादा लावल्यामुळे पेण येथील सार्वजनिक बांधकाम बिभागाच्यावतीने दिनांक 21 जानेवारी रोजी सदरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. मात्र सदरील अतिक्रमण हटविण्याची ही मोहीम म्हणजे दिखावेगिरी असल्याचा आरोप तक्रारदार नसीम अधिकारी यांनी केला. यामध्ये रस्त्यासाठी दोन्ही बाजूने 30 – 30 मिटर असे एकूण 60 मिटर भुसंपादित क्षेत्र असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने अर्धवट अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. यावेळी तक्रारदार यांनी पूर्ण अतिक्रमण हटवून रस्त्याच्या रुंदीकरण कामाची मागणी केली असता सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक रिकाम्या हाती माघारी झाल्याने या प्रकारात आर्थिक दबाव आहे का? असा संशय देखील नसीम खान अधिकारी यांनी व्यक्त केला आहे.

सदरील प्रकाराबाबत अधिकारी कुटुंबाने 7 – 10 – 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात देखील तक्रार दाखल करण्यासाठी गेले असताना याठिकाणी सदरील अतिक्रमण धारक मंजर मोहम्मद अली जुईकर आणि मोहब्बत अजीम हे याठिकाणी दाखल झाले. यावेळी तक्रार यांच्यासोबत वाद घालत त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली. याबाबत तक्रारदार यांच्या कुटुंबियांच्या वतीने या दोघांवर अलिबाग पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. मुळातच गुन्हेगारी वृत्तीने अतिक्रमण केले असल्याचा हा सढळ पुरावा शासनाकडे असतानाही शासनाचे अधिकारी या अतिक्रमण धारकांना वारंवार पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील नसीम खान अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

दिनांक 21 जानेवारी रोजी पेणचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिक्रमण हटविणारे पथक या ठिकाणी आले असताना मात्र अतिक्रमण धारक मंजर मोहम्मद अली जुईकर यांनी आपण मुस्लिम असल्यामुळे आपल्याला नोटीसा पाठवून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा कांगावा केला. तसेच अतिक्रमण पथक हे माघारी फिरल्यानंतर आपण विजयी झाल्यासारखे फोटो सोशल मीडियावर व्हायरलं केले. मात्र हे अतिक्रमण धारक पूर्ण खोटे बोलून मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे काम करीत असल्याचे तक्रारदार नसीम खान अधिकारी यांनी यावेळी सांगितले. तसेच याबाबत योग्य ती कायदेशीर लढाई लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असेही बोलताना त्यांनी सांगितले.

2.7/5 - (4 votes)

खबरे दुनिया कि

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 0 3 8

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे