आज्जीबाईंनी चक्क 25 वर्षांनंतर केलं प्रपोज; बोलल्या “आय लव्ह यु”
प्रितम जे. एम. म्हात्रे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात पार पडला खेळ पैठणीचा कार्यक्रम

पनवेल : राज भंडारी
शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा खजिनदार प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त उलवे नोड येथे महिलांसाठी खेळ पैठणीचा आणि हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. उलवे येथील शिवसंघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने सेक्टर 20 येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांसाठी खेळविण्यात आलेल्या खेळ पैठणीचा या कार्यक्रमातून संगीत खुर्ची, बिस्कीटचा खेळ तसेच अचानक आपल्या पतीरायांना दूरध्वनीवरून प्रपोज करण्याच्या खेळांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी एका आज्जीबाईंनी तब्बल 25 वर्षात पहिल्यांदाच आपल्या पतीरायांना आय लव्ह यु म्हटल्यावर आजोबांची रिऍक्शन देखील ऐकण्यासारखी होती. आजोबांनी तर काय भानगड आहे म्हणून विचारायला सुरुवात केली आणि उपस्थित साऱ्या उलवेवासियांना हसू आवरणे कठीण झाले. शिवसंघर्ष प्रतिष्ठान उलवेचे अध्यक्ष अखिलदादा यादव यांच्यावतीने जनतेच्या मनातील आमदार म्हणून उपाधी मिळालेले पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम जे. एम. म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रीतम म्हात्रे यांच्या अर्धांगिनी सौं. ममता प्रीतम म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माईताई भोईर, तसेच शिवसंघर्ष प्रतिष्ठान उलवेचे पदाधिकारी, महिला आदीसह उलवेवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.