
पनवेल : स्पेशल रिपोर्ट
मूळ गाव शेगाव येथून मुंबई नगरीत दाखल झालेल्या शाहीर शेख या तरुणाने उद्योजक क्षेत्रात उडी घेऊन यशस्वी होण्याचा सन्मान पटकावीला आहे. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून मित्र परिवारात ज्याला संबोधले जाते असा तरुण उद्योजक म्हणजेच शाहीर शेख होय…, त्यांच्याबाबत थोडेसे….
आज 24 डिसेंबर म्हणजे शाहीर शेख या तरुण उद्योजकाचा वाढदिवस. शाहीर यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या मित्र परिवारासाठी एक आगळा वेगळा सणच जणू. 24 डिसेंबर या दिवशी शाहीर यांचे सर्वच मित्र त्यांना भेटून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर त्यांनी यश आपल्या पदरात पाडून घेत एक यशस्वी उद्योजक म्हणून नाव लौकिक मिळविले.
मुळ गाव शेगाव येथून मुंबईमध्ये आलेला शाहीर शेख या तरुणाने आपला उदर निर्वाह चालवत असतानाच आपल्या वयाच्या तारुण्यात एक जिद्द डोळ्यासमोर ठेवून ध्येय गाठण्यास सुरुवात केली. एका सर्वसाधारण घरातून जन्मलेल्या शाहीर शेख या तरुणाने मुंब्रा परिसरात आपले स्थान अधिक घट्ट रोवले. याच ठिकाणी राहून त्यांनी आपला जिवाभावाचा असा मित्र परिवार जमविला. त्यानंतर स्वतःचा असा व्यवसाय त्यांनी सुरु केला. मात्र याच काळात देशभरात कोरोना सारख्या महाभयंकर महामारीने अनेक उद्योग, रोजगार उध्वस्त केले, मात्र याला खऱ्या अर्थाने अपवाद ठरले ते म्हणजेच शाहीर शेख.
देशातील महामारीमध्ये सुद्धा एक समाजसेवेची भावना ठेवून त्यांनी आपला व्यवसाय सुरु ठेवून देश हितासाठी त्याचा वापर केला. अनेक व्यावसायिक आपले बस्तान गुंडाळून घरी बसले असतानाही त्यांनी आपली समाजसेवा ही भावना सोडली नाही. आणि त्यांनी अविरतपणे अनेक औषधे, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंचे किट, घेऊन जाण्यासाठी आपली सेवा सुरूच ठेवली. त्यांच्या या देशसेवेचा त्यांना फटका न बसता ते सक्षम होत गेले. एका बाजूला देशासेवा सुरु झाली आणि दुसऱ्या बाजूला व्यवसायात वाढ होत होती. परिणामी देशासेवेच्या भावनेतून व्यवसायात झालेली वाढ पाहता ते एक यशस्वी उद्योजक बनले. त्यांच्या याच जिद्द आणि मेहनतीचे प्रतीक म्हणून मित्र परिवारात त्यांनी आपले स्थान अधिक घट्ट केले.
सध्या शाहीर शेख हे पनवेलमध्ये खांदा कॉलनी याठिकाणी कार्यरत असून त्यांच्या कंपनीचा व्यवसाय सुरु आहे. आज 24 डिसेंबर हा त्यांचा वाढदिवस असल्यामुळे हा लेख प्रपंच करून आमच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा!!!