राजकिय

पनवेलमध्ये बाळाराम पाटील यांचे मशाल चिन्ह मागे का घेतले; भाजपची डील झाली का ?

शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केला बाळाराम पाटील यांचा गेम ?

0 0 2 0 3 8

पनवेलमध्ये बाळाराम पाटील यांचे मशाल चिन्ह मागे घेण्यासाठी भाजपकडून मोठी डील खरंच झाली का ?

शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केला बाळाराम पाटील यांचा गेम ?

कोट्यावधींचा व्यवहार झाला असल्याच्या पनवेलात चर्चा सुरूच !

आमदाराच्या हस्तकानेच गावगोंधळ केल्याची चर्चा; म्हणूनच सर्व आले बाहेर !

पनवेल : राज भंडारी

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम हॅक होण्याच्या घटनेपेक्षा महाभयंकर अशी घटना पनवेलचे सुरुवातीला महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्यासाठी गेलेले बाळाराम पाटील यांच्याबाबत घडली आहे. यामध्ये त्यांना शिवसेनेने एबी फॉर्म दिला होता, अर्ज दाखल करताना मशाल चिन्हाचा जोमाने वापर करण्यात आल्यानंतर मात्र भाजपचे वातावरण गढूळ होऊन बसले. लागलीच भाजपने पनवेलमधील एका शिवसेनेच्या मोठ्या नेत्याला हाताशी धरून रात्रीस खेळ करीत करोडोंच्या घरात व्यवहार करून आपले ध्येय साध्य करून शिवसेनेच्या एबी फॉर्मला मागे घेण्याच्या हालचाली करून तसे साध्य केल्याच्या चर्चा समोर येत आहेत. पनवेलच्या आमदारांच्या गाडीत फिरणाऱ्या एका महत्त्वपूर्ण जबाबदारी असणाऱ्या पदाधिकाऱ्याने कुठे कुठे गावगोंधळ केला आहे हे त्यालाच ठावूक, मात्र सद्यस्थितीत समोर आलेल्या या डावपेचामुळे पनवेलमध्ये भाजपने आपला मार्ग मोकळा केला असल्याच्या चर्चांना नाक्यानाक्यावर उधाण आले आहे.

काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर महायुती पूर्णपणे हादरून गेली होती. राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळाले होते, त्यामुळे सत्ता हातातून जाणार या विचाराने पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी काय करावे लागेल यासाठी भाजपकडून पूर्ण यंत्रणा राबविण्यात आली. सिंधुदुर्गात केसरकरांच्या विरोधात बंड करणाऱ्या विशाल नावाच्या भाजपच्या अपक्ष उमेदवाराला शांत करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा ऑडिओ व्हायरल झाला. यामध्ये देवेंद्रजी आपलं ऑल सेट आहे असा उल्लेख करीत असल्यामुळे खरंच ईव्हीएम मॅनेज झालंय असा विश्वास विरोधकांना पटलाय. उरण विधानसभेमध्ये शेकापचे उमेदवार शिट्टी या चिन्हावर ८२३ मतांनी विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली. लागलीच भाजपचे उमेदवार महेश बालदी यांनी आक्षेप घेतल्यानंतर फेरनोंदणीमध्ये भाजपचे उमेदवार डायरेक्ट ६५१३ मतांनी विजयी होणे, हे गणित सर्वसामान्यांच्या डोक्यावरून जाणारे असले तरी “कुछ तो गड़बड़ है भाई |” असा प्रसार होण्यासाठी वेगळे तंत्र वापरण्याची गरज पडत नाही.

पनवेलचे राजकारण माजी खासदार रामशेठ ठाकूर हे चालवतात. त्यांच्या शाब्दिक आणि आर्थिक गणीतांपुढे दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस सुद्धा कमी पडावेत, असा त्यांचा अनेक वर्षांचा राजकारणातील अनुभव आहे. त्यांच्या खासदारकीच्या निवडणुकांमध्ये रायगडचे विद्यमान खासदार सुनील तटकरे हे त्यांच्याकडून काहीतरी रसद मिळावी म्हणून प्रतीक्षेत असायचे. या अशा राजकारण्याचे महत्त्व असले तरी ते रायगड वासियांसाठी आणि मुख्यत्वे पनवेल – उरणसाठी भाजपवासी नको हवे होते, अशी देखील चर्चा यानिमित्ताने समोर आली आहे.

कोकण शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार बाळाराम पाटील हे नेक मनाचा माणूस म्हणून काम करीत आले आहेत. आपले वडील आमदार होते म्हणून कोणताही माज त्यांनी केला नाही. बाळाराम पाटील यांनी नेहमीच अन्यायाच्या विरोधात काम केलं आहे, मात्र त्यांच्या वागण्याचा गैरफायदा घेवून काही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. जर महाविकास आघाडीचे तीन तुकडे झाले नसते तर कदाचित आज पनवेलचे आमदार बाळाराम पाटील हेच झाले असते. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेत फूट पडली असली, त्यांची बाळाराम पाटील यांच्या सभेला उपस्थिती लागली असली, तरी ती मते बाळाराम पाटील यांना नक्कीच पडली नसावी, अशी परिस्थिती फूट पडणाऱ्यांच्या डोक्यावर आशीर्वाद ठेवणाऱ्या नेत्याने केलेल्या कामाबाबत बोलावी लागेल. त्यामुळेच आपली आमदारकी शाबूत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्यांनी आपले ध्येय साध्य केले, अशी चर्चा आज सर्वत्र पहायला मिळत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

खबरे दुनिया कि

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 0 3 8

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे