राजकिय

नेरुळ-उरण ट्रेन ही 12 डब्याची करून फेऱ्या वाढवाव्यात

शेकाप नेते प्रितम म्हात्रे यांची मागणी

0 0 2 0 3 8

उरण : प्रतिनिधी

नेरुळ ते उरण दरम्यान उलवे, खारकोपर, द्रोणागिरी, उरण शहर या नव्याने वाढत असलेल्या शहरांमधील लोकवस्ती पाहता सकाळी आणि सायंकाळी कामानिमित्त प्रवासादरम्यान नव्याने सुरू झालेल्या नेरुळ ते उरण ट्रेन च्या फेऱ्या ह्या खूप कमी पडत आहेत. प्रवास करणारा वर्ग हा नोकरदार पासून ते शाळेत जाणारे विध्यार्थी आणि महिला आहेत त्यासाठी सद्यस्थितीत असणारी ट्रेन सुवीधा कामाच्या वेळी कमी पडत आहे. अशा तक्रारी शेतकरी कामगार पक्षाचे नेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्याकडे विविध विभागातील नागरिकांकडून आल्या. यावर काही ठोस पावले उचलण्यासाठी त्यांनी यासंदर्भात रेल्वे विभागाकडे पाठपुरावा केला.

त्यात त्यांनी 9 डब्बाच्या जागी 12 डब्बाच्या ट्रेन चालु कराव्या आणि नेरूळ ते उरण दरम्यान ट्रेनच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी केली आहे.

कोट

नेरूळ ते उरण रेल्वे फेऱ्यां मधील वेळेचे अंतर हे खूप जास्त आहे. कामाच्या वेळी त्याचा ताण येऊन नागरिकांना मुख्यत्वे करून महिलावर्ग आणि विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत आहे अशा तक्रारी माझ्याकडे आल्या त्यामुळे संबंधित विभागाकडे मी पाठपुरावा सुरू केला आहे आणि लवकरच ही अडचण निकाली निघेल अशी मला आशा आहे.

प्रितम जनार्दन म्हात्रे

खजिनदार

शेतकरी कामगार पक्ष

रायगड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

खबरे दुनिया कि

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 0 3 8

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे